सीमा हैदर कोण आहे?,ती भारतात कशी आली, आणि तिचे प्रेम प्रकरण काय आहे? (Sheema Haider kon ahe ti bhartat kasi aali,aani tiche prem prakaran kay ahe? latest news in marathi) (Age, Ex Husband, Story, Pakistani Mahila, Jasoos, Biography)
पाकिस्तानी भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीमा हैदरचे नाव सध्या भारतीय मीडियामध्ये चर्चेत आहे, कारण सीमा हैदरचा जन्म पाकिस्तानात झाला होता, पण आता ती भारताची सून झाली आहे. सीमा हैदरच्या या कृत्याने भारतातच नाही तर पाकिस्तानातही हाहाकार माजला आहे. तर एकीकडे सीमा हैदरचा पूर्व पती सीमा हैदरला पाकिस्तानात परत येण्यास सांगत आहे., तर तीच सीमा हैदरला पाकिस्तानात परत जायचे नाही असे तिने स्पस्ट केलंय . सीमा हैदरबद्दल अनेक भारतीयांना अजूनही माहिती नाही आणि ज्यांना माहित आहे त्यांना सीमा हैदर कोण आहे हे जाणून घायची उत्सुकता आहे. सीमा हैदर यांचे चरित्रही अनेकांना वाचायचे आहे. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला सीमा हैदर हिच्या बद्दलची माहिती मराठीत पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे जेणेकरून सीमा हैदर यांचा जीवन परिचय वाचून तुम्हाला कळेल की सीमा हैदर कोण आहे.
पूर्वीचे नाव :- सीमा हैदर
सध्याचे नाव :- सीमा मीना
पूर्वीचा धर्म :- इस्लाम
सध्याचा धर्म :- हिंदू
पूर्व पतीचे नाव :- गुलाम हैदर
सध्याच्या पतीचे नाव :- सचिन मीना
शिक्षण :- पाचवी पास
वडिलांचे नाव :- गुलाम रझा रिंद
पूर्वी राहत असलेला प्रांत :- बलूच, पाकिस्तान
एकूण अपत्य :- चार (मुलगा एक, मुली तीन)
सीमा हैदर कोण आहे? (Sima haidar kon ahe)
सीमा हैदर हीला सीमा गुलाम हैदर किंवा सीमा रिंद किंवा सीमा जाखरानी या नावानेही ओळखले जाते, ही पाकिस्तानमध्ये बलूच प्रातांत राहणारी एक मुस्लिम मुलगी आहे जिने एका हिंदू मुलाशी लग्न केल्यानंतर आता हिंदू धर्म स्वीकारला आणि भारता मध्ये नोएडा या शहर मध्ये तीच्या नवीन नवऱ्या सोबत राहत आहे.
सीमा हैदरचे वय आणि सुरुवातीचे आयुष्य
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरचा जन्म 1995 मध्ये झाला होता. अशाप्रकारे सध्या 2023 नुसार तीचे वय 28 वर्षे आहे. तीचा जन्म 1 जानेवारी 1995 मध्ये झाला. सीमा हैदर हीचा पहिला नवरा गुलाम हैदर यांच्या म्हणण्यानुसार, सीमा हैदर हिने कोणत्याही शाळेतून शिक्षण घेतलेले नाही. सीमा हैदरने फक्त काही स्वयंसेवी संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.
सीमा चे हैदर कुटुंब
तिच्या वडिलांचे नाव गुलाम रझा रिंद असून तिचा एक भाऊ ही आहे जो पाकिस्तानी लष्करात नौकरी करतो.
सीमा हैदर चे पहिले लग्न, पती आणि अपत्य
सीमा हैदरचे पहिले लग्न पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जेकोबाबाद जिल्ह्यातील गढ़ी खैरो गावात राहणारे गुलाम हैदर यांच्याशी झाले होते आणि सध्या ते सौदी अरेबियामध्ये कार्यरत आहेत. 2019 मध्ये गुलाम हैदर सौदी अरेबियाला गेला होता. त्यापूर्वी तो पाकिस्तानातच मजूर आणि रिक्षाचालक म्हणून काम करत असे. सीमा हैदर यांना ४ मुले आहेत , (१ मुलगा आणि ३ मुली). मुलाचे नाव फरहान अली असून तो 8 वर्षांचा असून तो आता राज या नावाने ओळखला जातो. तसेच तीन मुलींपैकी एकीचे नाव फरवा आहे, जी आता प्रियांका म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या मुलीचे नाव फरीहान बैतुल असून ती मुन्नी म्हणून ओळखली जाते आणि फरहा बतुल ही परी म्हणून ओळखली जाते, कारण आता सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे तिने तिच्या मुलांची नावेही बदलली आहेत.
सीमा हैदरचे दुसरे लग्न आणि पती (सीमा हैदर दुसरा पती)
तिच्या सध्याच्या पतीचे नाव सचिन मीना असून तो उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहतो . अशा प्रकारे सीमा हैदर आता सीमा मीना बनली आहे. सीमा हैदर आणि सचिन यांनी मार्च 2023 मध्ये नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आणि आता सीमा हैदर सध्या सचिनच्या घरी राहत आहे.
सीमा हैदर धर्म
सीमा हैदर ही आधी पाकिस्तानी बलुच समाजाशी संबंधित होती आणि इस्लाम धर्माचे पालन करत होती , मात्र सीमा हैदरनी सचिन मीना यांच्याशी तिच्या इच्छेने लग्न केले आहे आणि आता तिने सनातन हिंदू धर्म स्वीकारला आहे. अशा प्रकारे तीचा पूर्वीचा धर्म इस्लाम मानला जाईल आणि आताचा धर्म हिंदू धर्म मानला जाईल. एका मुलाखतीत सीमा हैदरने सांगितले होते की तिला हिंदू धर्म खूप आवडतो आणि सचिनशी लग्न करण्यापूर्वीच तिने मनापासून हिंदू धर्म स्वीकारला होता आणि हिंदू धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली होती.
सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी (सीमा आणि सचिन लव्ह स्टोरी)
2020 च्या जुलै महिन्यात प्रथमच सीमा हैदर आणि सचिन मीना PUBG खेळताना एकमेकांशी बोलले आणि लवकरच या संवादाचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी एकमेकांच्या व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाण केली आणि व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आणि व्हॉईस कॉलद्वारे बोलणे सुरू केले आणि चांगले मित्र बनले. अशा प्रकारे, जानेवारी 2021 मध्ये, त्यांनी एकमेकांशी त्यांचे प्रेम ऑनलाइन व्यक्त केले आणि एकमेकांना भेटण्याचे मार्ग शोधू लागले.
सीमाने फेब्रुवारी २०२३ मध्ये भारतीय व्हिसासाठी अर्ज केला, पण तो नाकारला गेला. यानंतर सीमाला समजले की भारतीय लोक कोणत्याही व्हिसाशिवाय नेपाळमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे सीमा आणि सचिनने मार्च 2023 मध्ये नेपाळमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सीमा आपल्या मुलांना पाकिस्तानमध्ये सोडून नेपाळमध्ये सचिनला एकटी भेटली. ते 10 मार्च 2023 रोजी नेपाळमध्ये भेटले, जिथे त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी 8 ते 9 दिवस एकत्र घालवले. यानंतर सचिन भारतात आला आणि सीमा पाकिस्तानला गेली.
सीमा हैदर भारतात कशा पद्दतीने आली आहे
पाकिस्तानात गेल्यानंतर सीमा हैदरला वाटले की आपण कायदेशीररित्या भारतात जाऊ शकत नाही, तेव्हा तिने नेपाळमधून भारतात जाण्याचा प्लॅन केला. यासाठी तिने आपली जमीन विकली आणि त्यानंतर ती विमानाने कराचीहून सरजहानला पोहोचली आणि त्यानंतर कनेक्ट फ्लाइटने ती नेपाळला पोहोचली. येथून सीमाने व्हॅनने पोखरात प्रवेश केला आणि 11 मे 2023 रोजी ती बसने दिल्लीला पोहोचली. दिल्लीत आल्यानंतर ती काश्मिरी गेटवर उतरली. तिथून ती बसने जेवरला पोहोचली आणि बसमधून जेवरला निघून ती उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा शहरात येणाऱ्या सचिनच्या रबुपुरा गावात पोहोचली. येथे सीमा हैदरने सचिनची भेट घेतली. सचिन तीला त्याच्या भाड्याच्या खोलीत घेऊन निघून गेला.
सीमा हैदर वाद
सीमा हैदर देखील वादात सापडली आहे कारण बरेच लोक असे म्हणत आहेत की ही एक पाकिस्तानी गुप्तचर एजंट असू शकते जी अत्यंत हुशारीने भारतात घुसली आहे आणि काही काळानंतर ती भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पोहोचवण्याचे काम करेल. दुसरीकडे, अनेक लोक या सर्व गोष्टी नाकारत आहेत. सीमा आणि सचिनच्या प्रेमाला लोक खरे प्रेम म्हणत आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
The $390 Million Wonder: What Lies Inside the Statue of Unity?
The $390 Million Wonder: What Lies Inside the Statue of Unity? : Near by Airport, Railway Station, Hotels, and others Tourism Spots Have you...
No comments
If you have any doubt, please let me know.